पावसाळा उन्हाळ्यातील उष्णतेपासून दिलासा देतो म्हणून आपोआपच मन प्रसन्न होते आणि निसर्गाचे सौंदर्य खुलते म्हणून पर्यंटनाचा आनंद घेता येतो. ह्या आनंददायी वातावरणासोबतच हा ऋतु आरोग्यासंबंधी आव्हाने घेऊन येतो. विशेषतः. वाढलेली आर्द्रता, सतत बदलणारे तापमान, अस्वच्छ पाणी, डास व किटकांचा वाढता प्रादुर्भाव, आणि वाढते संसर्ग यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पावसामुळे सगळीकडे चिखल होतो, भरपूर पाऊस […]
चिंता म्हणजे काय? त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार
मानसिक आरोग्याबद्दलच्या संभाषणांमध्ये वारंवार येणारा शब्द म्हणजेच चिंता किंवा नैराश्य. ही एक सामान्य मानसिक आरोग्याची स्थिती असून यामुळे जगभरातील लाखो लोक त्रस्त आहेत आणि योग्य मदतीच्या आशेने रोज ह्या स्थितीचा संघर्ष करत आहेत. ही प्रत्येकासाठी वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते ज्यामध्ये सौम्य अस्वस्थतेपासून ते गंभीर पॅनीक अटॅक पर्यंतचे वेदनादायी परिणाम होताना दिसून येतात. हा विकार समजून […]
Webstories
उष्माघात आणि डिहायड्रेशन रोखणारे सर्वोत्तम पेय View योगाचे ६ आश्चर्यकारक फायदे View शरीरातील उष्णता कमी करणारी आरोग्यदायी फळे View दररोज चालण्याचे ५ जबरदस्त फायदे View
ऋतुचर्या आणि आयुर्वेदिक जीवनशैली
निसर्गनियमानुसार काही ठराविक काळानंतर ऋतू बदलतात. बदल हा सृष्टीचा नियम आहे. आयुर्वेदानुसार बाहेरील बदलत्या ऋतूचा शरीरातील त्रिदोषांवर परिणाम होत असतो. शरीराची स्थिती व सतत बदलती बाह्य स्थिती यात सुसंवाद निर्माण होणं गरजेचं असतं. आयुर्वेद हे फक्त व्याधी आणि त्यावरील उपचाराचे शास्त्र नाही, तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. आयुर्वेदिक दिनचर्या, ऋतुचर्या, स्वास्थ्य आणि आरोग्य कमवण्याचे , निरोगी राहण्याचे साधन आहे. ऋतुचर्या म्हणजे आयुर्वेद […]
मुलांसाठी योग्य पौष्टिक आहार आणि चांगल्या सवयी
मुलांनी पौष्टिक आहारची सवय आणि आरोग्यदायी दिनचर्या विकसित केली आहे की नाही याची खात्री करणे म्हणजेच त्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे. आजकाल जरी फास्ट फूड हा पालक व मुलं दोघांच्या आवडीचा पर्याय असला तरी त्याचे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम दुर्लक्षित केले जाऊ शकत नाहीत. म्हणून पालकांनी मुलांच्या पोषक आहाराच्या सवयी आणि योग्य दिनचर्येला प्रोत्साहन देण्यासाठी […]
स्क्रीन टाईम तुमच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतो ?
आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे मोबाईल, टॅबलेट, कॉम्पुटर, लॅपटॉप . अशा बऱ्याच उपकरणांचा वापर करून रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घरबसल्या तुम्ही काहीही करू शकता. दिवसेंदिवस साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा या उपकरणांवर अवलंबून राहण्याची सवय अनेक लोकांमध्ये वाढलेली दिसून येते. परिणामतः स्क्रीन टाईम मध्ये सतत वाढ होत आहे. या उपकरणांच्या सतत संपर्कामुळे शारीरिक […]
फास्ट फूडचे मुलांच्या आरोग्यावर होणारे 7 घातक परिणाम
आजच्या वेगवान जगात, फास्ट फूड हा अनेक कुटुंबांच्या जीवनाचा एक सामान्य भाग बनला आहे. पालक व्यस्त दिनचर्येमूळे मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत आणि देता येईल तेवढ्या वेळेत मुलांचे फक्त हट्ट पुरवले जातात. हे हट्ट पुरवताना बाहेरील खाद्यपदार्थ किंवा रेडी टु कुक सारखे पदार्थ मुलांसाठी तसेच पालकांसाठी आकर्षक निवड बनत चालले आहेत. नकळत पालकांकडूनच मुलांना […]
अल्कोहोलचे शरीरावर होणारे 10 हानिकारक परिणाम
जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये मद्यपान करणे ही एक सामान्य सामाजिक बाब आहे आणि मध्यम स्वरूपात करणे हे अनेकदा स्वीकार्य मानले जाते. परंतु ही घातक सवय अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांचे कारण ठरू शकते. जास्त प्रमाणात किंवा नियमित मद्यपान केल्याने आपल्या आरोग्यावर अनेक गंभीर अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव होऊ शकतात. अल्कोहोलचा शरीरावर कसा परिणाम होतो आणि त्याच्या […]
उष्माघाताची लक्षणे आणि त्यावरील त्वरीत उपाय
उष्माघात म्हणजे काय ? उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उध्दभवणारा चिंताजनक असा उष्माघात हा आजार आहे, ज्याला हिटस्ट्रोक किंवा सनस्ट्रोक असेही म्हणतात. ज्यात शरीर नैसर्गिक पद्धतीने स्वतःचे तापमान नियंत्रित करू शकत नाही. ज्यावेळी शरीराचे तापमान 104°F (40°C) पेक्षा जास्त असते. त्यावेळी शरीराची घाम येण्याची यंत्रणा निकामी होते , त्यामुळे काहीवेळा गंभीर आणि जीवघेणी स्थिती निर्माण होते अचानक […]
ॲसिडीटी होण्याची कारणे, लक्षणे आणि आयुर्वेदिक उपचार
दैनंदिन जीवनामध्ये खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेक शाररिक त्रासाला सामोरे जावं लागत. त्यातीलच एक नकोसा वाटणारा ,अस्वस्थता वाढवणारा त्रास म्हणजे ऍसिडिटी. हा त्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. यात छातीत जळजळ होत असते. आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. जे अन्न पचण्यास आणि बारीक तुकडे करण्यात मदत करते. त्याचे प्रमाण वाढल्यास तसेच ते […]