Author: Dr Snehal Kathale

Ayurved

ऋतुचर्या आणि  आयुर्वेदिक जीवनशैली

निसर्गनियमानुसार  काही ठराविक काळानंतर ऋतू बदलतात.  बदल हा सृष्टीचा नियम आहे. आयुर्वेदानुसार बाहेरील बदलत्या ऋतूचा शरीरातील त्रिदोषांवर परिणाम होत असतो.  शरीराची  स्थिती व सतत बदलती बाह्य स्थिती यात सुसंवाद निर्माण होणं गरजेचं असतं. आयुर्वेद हे फक्त व्याधी आणि त्यावरील  उपचाराचे   शास्त्र नाही, तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. आयुर्वेदिक दिनचर्या, ऋतुचर्या, स्वास्थ्य आणि  आरोग्य कमवण्याचे , निरोगी राहण्याचे साधन आहे.     ऋतुचर्या  म्हणजे आयुर्वेद  […]

Parenting

मुलांसाठी योग्य पौष्टिक आहार आणि चांगल्या सवयी

मुलांनी पौष्टिक आहारची सवय आणि आरोग्यदायी दिनचर्या विकसित केली आहे की नाही याची खात्री करणे म्हणजेच त्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे. आजकाल जरी फास्ट फूड हा पालक व मुलं दोघांच्या आवडीचा पर्याय असला तरी त्याचे आरोग्यावर होणारे हानिकारक परिणाम दुर्लक्षित केले जाऊ शकत नाहीत. म्हणून पालकांनी मुलांच्या पोषक आहाराच्या सवयी आणि योग्य दिनचर्येला प्रोत्साहन देण्यासाठी […]

Mental Health

 स्क्रीन टाईम तुमच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतो ?  

  आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे मोबाईल, टॅबलेट, कॉम्पुटर, लॅपटॉप . अशा बऱ्याच उपकरणांचा  वापर करून रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घरबसल्या तुम्ही काहीही करू शकता.  दिवसेंदिवस साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा या उपकरणांवर अवलंबून राहण्याची सवय अनेक लोकांमध्ये वाढलेली दिसून येते. परिणामतः स्क्रीन टाईम मध्ये सतत वाढ होत आहे.  या उपकरणांच्या सतत संपर्कामुळे शारीरिक […]

Parenting

फास्ट फूडचे मुलांच्या आरोग्यावर होणारे 7 घातक परिणाम

आजच्या वेगवान जगात, फास्ट फूड हा अनेक कुटुंबांच्या जीवनाचा एक सामान्य भाग बनला आहे. पालक व्यस्त दिनचर्येमूळे मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत आणि देता येईल तेवढ्या वेळेत मुलांचे फक्त हट्ट पुरवले जातात. हे हट्ट पुरवताना बाहेरील खाद्यपदार्थ किंवा रेडी टु कुक सारखे पदार्थ मुलांसाठी तसेच पालकांसाठी आकर्षक निवड बनत चालले आहेत. नकळत पालकांकडूनच मुलांना […]

Fitness

अल्कोहोलचे शरीरावर होणारे 10 हानिकारक परिणाम  

जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये मद्यपान करणे ही एक सामान्य सामाजिक बाब आहे आणि मध्यम स्वरूपात करणे हे अनेकदा स्वीकार्य मानले जाते. परंतु ही घातक सवय अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांचे कारण ठरू शकते. जास्त प्रमाणात किंवा नियमित मद्यपान केल्याने आपल्या आरोग्यावर अनेक गंभीर अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव होऊ शकतात. अल्कोहोलचा शरीरावर कसा परिणाम होतो आणि त्याच्या […]

Disease

उष्माघाताची लक्षणे आणि त्यावरील त्वरीत उपाय

उष्माघात म्हणजे काय ? उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे उध्दभवणारा  चिंताजनक असा उष्माघात हा आजार आहे, ज्याला हिटस्ट्रोक किंवा सनस्ट्रोक असेही म्हणतात. ज्यात शरीर नैसर्गिक पद्धतीने स्वतःचे तापमान नियंत्रित  करू शकत नाही. ज्यावेळी शरीराचे तापमान 104°F (40°C) पेक्षा जास्त असते. त्यावेळी शरीराची  घाम येण्याची यंत्रणा निकामी होते , त्यामुळे काहीवेळा गंभीर आणि जीवघेणी स्थिती निर्माण होते अचानक […]

Disease

ॲसिडीटी होण्याची कारणे, लक्षणे आणि आयुर्वेदिक उपचार

   दैनंदिन जीवनामध्ये खाण्यापिण्याच्या  चुकीच्या सवयीमुळे अनेक शाररिक त्रासाला सामोरे जावं लागत. त्यातीलच एक नकोसा वाटणारा ,अस्वस्थता वाढवणारा त्रास म्हणजे ऍसिडिटी. हा त्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. यात छातीत जळजळ होत असते. आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. जे अन्न पचण्यास आणि बारीक तुकडे करण्यात  मदत करते. त्याचे प्रमाण वाढल्यास तसेच ते […]

Disease

अल्झायमर म्हणजे काय ? कारणे , लक्षणे आणि उपचार

अल्झायमर हा एक जटिल  असा मेंदूचा विकार असून  रुग्ण आणि त्यांचे  जवळचे नातेवाईक यांच्यासाठी अतिशय त्रासदायक आजार आहे. हा आजार जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत आहे , यामुळे प्रामुख्याने व्यक्तीची स्मृती ,आकलन शक्ती आणि दैनंदिन कार्य बिघडते. या आजाराचे टप्पे जसे जसे वाढत जातात तसे तसे याची जटिलता वाढत जाते.  अल्झायमर होण्याची कारणे :- हा […]

Disease

उन्हाळ्यातील 9 त्रासदायक समस्या आणि त्यावरील उपाय

मार्च ते मे  महिन्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा वाढणे, काम कमी केले तरी जास्त दमायला होणे तसेच घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जाणे, ह्या बाबींची देखील सुरुवात होते. तापमान बदल व वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नाही तर उन्हाळ्यामुळे उध्दभवणाऱ्या  समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 1)उष्माघात /Heatstroke:- हा उन्हाळ्यात […]

Beauty

नैसर्गिकरित्या पांढरे केस काळे होण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय

सौंदर्याच्या व्याख्येमध्ये केसांचे काळेभोर, लांब, दाट असणे जास्त उत्तम मानले जाते. अशा काळ्याभोर, दाट केसांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य जास्त खुलून दिसते. पण आजकाल पांढऱ्या केसांची समस्या कोणत्याही वयोगटात अगदी सामान्य बनत चालली आहे. ही समस्या फक्त आता वृद्ध व्यक्तींमध्येच राहिलेली नाही, आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुमचे सुद्धा वय कमी असेल […]

Back To Top