ॲसिडीटी होण्याची कारणे, लक्षणे आणि आयुर्वेदिक उपचार

Untitled design 1

ॲसिडीटी होण्याची कारणे, लक्षणे आणि आयुर्वेदिक उपचार

   दैनंदिन जीवनामध्ये खाण्यापिण्याच्या  चुकीच्या सवयीमुळे अनेक शाररिक त्रासाला सामोरे जावं लागत. त्यातीलच एक नकोसा वाटणारा ,अस्वस्थता वाढवणारा त्रास म्हणजे ऍसिडिटी. हा त्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. यात छातीत जळजळ होत असते. आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. जे अन्न पचण्यास आणि बारीक तुकडे करण्यात  मदत करते. त्याचे प्रमाण वाढल्यास तसेच ते आम्ल पोटातून अन्ननलिकेत आल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ लागतो. ॲसिडिटीपासून लवकर आराम मिळवण्यासाठी अनेक उत्तम घरगुती उपाय उपलब्ध आहेत.  त्यांचा अवलंब केल्याने रुग्णाला  आराम मिळतो. या सोबतच दीर्घ काळापासून हा  त्रास होत असल्यास आयुर्वेदिक उपचार, योग्य दिनचर्या जास्त परिणामकारक ठरत आहे.

 ॲसिडीटीची लक्षणे –

  • ऍसिडिटी मुळे पोटात आग व जळजळ होणे,
  • छातीत जळजळ होणे,
  • घशात जळजळणे
  • मळमळ किंवा उलटी होणे,
  • तोंडात आंबट पाणी येणे,
  • तोंडाची चव बदलणे,
  • ढेकर येणे,
  • पित्तामुळे डोके दुखणे,
  • अपचन होणे,
  • बद्धकोष्ठता समस्या होणे अशी प्रमुख लक्षणे आम्लपित्तात असतात.

 ॲसिडिटी होण्याची कारणे –

  • अयोग्य आहार घेण्यामुळे म्हणजे जास्त तिखट, मसालेदार, चमचमीत, आंबट पदार्थ खाण्याची सवय
  • वारंवार चहा, कॉफी पिण्याची सवय
  • वेळच्यावेळी जेवण घेण्याची सवय
  • भूक लागलेली असताना आहार घेणे
  • गॅसेस, अपचन, अल्सर, जठराचा दाह झाल्यामुळे
  • मानसिक ताणतणाव
  • अपुरी झोप, जागरण करणे
  • मद्यपान, धूम्रपान, तंबाखू अशा व्यसनांमुळे, तसेच वेदनाशामक गोळ्या औषधांचे सेवन
  • स्टिरॉईड्सची औषधे यांच्या अतिवापरामुळे आम्लपित्ताच्या तक्रारी वाढतात.

ॲसिडिटीचा त्रास असल्यास काय खावे..?

  वरचेवर ॲसिडिटी होत असल्यास आहारात तूप, डाळिंब, केळी, सुके किंवा ओले अंजीर, सफरचंद, भात, भाकरी, भाजी भरपूर खावी. हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा आम्लपित्तामध्ये खूप चांगला उपयोग होतो. दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. उपाशीपोटी फार वेळ न राहू नये. जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळाव्यात,  कामाच्या व्यापात जेवण करणे विसरू नका.

d5bdbff7 dd1c 49bf a113 d90335c9461f

ॲसिडिटी झाल्यावर काय खाऊ नये..?

तेलकट, तिखट पदार्थ, मसालेदार पदार्थ, खारट पदार्थ, लोणची, पापड, स्नॅक्स, चिप्स, फास्टफूड,बटाटेवडा, भजी, मैद्याचे पदार्थ खाणे तसेच चहा, कॉपी, कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.

ॲसिडिटी झाल्यावर लिंबूपाणी पिऊ नका, मद्यपान, तंबाखू व धुम्रपान पूर्णपणे बंद करावे, वारंवार वेदनाशामक गोळ्या औषधे खाणे बंद करावे.

पित्त दोष कसा ओळखायचा?

             अत्याधिक पित्ताचा त्रास, शरीरात जागोजागी सूज येणे, रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब, जळजळणे, त्वचेवर फोड, चट्टे उठणे, अन्नावरुन इच्छा उठणे अश्या समस्या सारख्या उध्दभवल्यास रुग्णाला पित्त दोष असू शकतो.

पित्त दोषावर उपाय 

 1)योग्य आहाराचे सेवन करा

       पित्ताचे शमन करणाऱ्या आहाराचे सेवन करा (कडवट, तुरट, मधुर चवीचा आहार). दुध, तूप, लोणी हे उत्तमरीत्या पित्ताचे शमन करतात. आंबट फळांऐवजी गोड फळे खा. मध आणि काकवी सोडून बाकी गोड वस्तूंचा वापर करू शकता.

2)वारंवार पित्त कशामुळे होते?

                  पित्त वाढविणाऱ्या अन्नाचे सेवन (तिखट, आंबट, खारट, मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि लाल मांस), कॉफी, ब्लॅक टी, निकोटीन (धुम्रपान), अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थ, उन्हात सतत वास्तव्य, भावनिक ताण, अतिश्रम किंवा/आणि अतिआळस. अशा अनेक कारणामुळे सतत पित्ताचा त्रास होत असतो.

3)योग्य आरामाची वेळ

                कार्यशीलता आणि विश्रांती ह्यात योग्य समन्वय साधा. कामातच फार गुंतून राहू नका किंवा विनाकारण खूप लोळणे टाळा.

4)चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्या

                 आहारविहाराच्या चांगल्या सवयी शरीर प्रकृतीवर सकारात्मक परिणाम करत असतात जसे  नियमित संतुलित आहार, योग्य पुरेसा व्यायाम,  संगत , निसर्गाचे सान्निध्य . प्रत्येकाने स्वतःच्या जीवनक्रमानुसार , व्यवसायानुसार आणि  वयानुसार आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी हे जाणून घेऊन आणि तिचा अवलंब जीवनात केल्यास आम्ल्पित्तासारख्या  दीर्घकालीन त्रासातून मुक्तता मिळेल.

 ध्यान करा आणि कृतज्ञ रहा

                       ध्यान करा आणि आपल्या पित्त प्रकृतीच्या भरकटणाऱ्या मनाला स्थिर करा. तसेच तुम्हाला लाभलेल्या सर्व गोष्टींची यादी करा आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव ठेवा.

मुख्य योगासने

                  मार्जारासन​,  शिशू  आसन, चंद्र नमस्कार,  उत्कटासन,  भुजंगासन,  विपरीत शलभासन,  पश्चीमोत्तानासन, अर्धनौकासन,  अर्धसर्वांगासन,  सेतूबंधासन,  शवासन,  योगिक श्वास  पित्तदोष कमी करण्यास उपयोगी  ठरतात.

पित्त झाल्यास प्रभावी आयुर्वेदिक औषध :-

1)अविपत्तीकर चूर्ण 1 चमचा जेवणाआधी  घ्यावे.

2)वाळा, कोकम सरबत घ्यावे.

3)काकडी, गाजर, बीट याचा कोशिंबीर रोज घ्यावे.

4)ताक, लस्सी रोज घ्यावे

5)काळे मनुके 8-10 सकाळी भिजवलेल्या पाण्यासहीत खावे.

6)धने +जिरे +बडीशेप +इलायची +दालचिनी याचे भिजवलेले पाणी घ्यावे.

वरील आयुर्वेदिक उपचारांमुळे पित्तदोषाच्या त्रासातून नक्कीच आराम  मिळेल. शिवाय हे उपचार मानसिक आरोग्यावरही प्रभावी ठरतात.

प्रश्नोत्तरे

1)कोणत्या ऍसिडमुळे पोटात ऍसिडिटी होते?

   आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिडचे जास्त झाल्यास आम्लपित्त होते. हायड्रोक्लोरिक ऍसिड मुळे ऍसिडिटी होते.

2)ॲसिडिटी रोज का होते?

  साधारणपणे खाण्यापिण्याच्या अनियमित पद्धती, शारीरिक हालचालींचा अभाव, मद्यपान-धूम्रपान, ताणतणाव आणि ॲसिडिटीचा धोका जास्त असतो. याशिवाय जास्त प्रमाणात मांसाहार, मसालेदार आणि तेलकट पदार्थामुळेही ॲसिडिटी होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top