स्क्रीन टाईम तुमच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतो ?  

hands 1851218 640 1

 स्क्रीन टाईम तुमच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतो ?  

  आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे मोबाईल, टॅबलेट, कॉम्पुटर, लॅपटॉप . अशा बऱ्याच उपकरणांचा  वापर करून रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये घरबसल्या तुम्ही काहीही करू शकता.  दिवसेंदिवस साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा या उपकरणांवर अवलंबून राहण्याची सवय अनेक लोकांमध्ये वाढलेली दिसून येते. परिणामतः स्क्रीन टाईम मध्ये सतत वाढ होत आहे.

 या उपकरणांच्या सतत संपर्कामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होतात.  याचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवरती जास्त झालेला दिसून येतो. निरोगी नातेसंबंध विस्कळीत होताना दिसत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर स्क्रीन टाईम चा परिणाम कसा होतो हे या लेखात आपण पाहणार आहोत ?

वाढत्या स्क्रीन टाईम चा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम-

बैठी जीवनशैली– सगळ्यात मोठा शरीरावर होणारा नकारात्मक आणि हळूहळू लक्षात येणारा स्क्रीन टाइमचा परिणाम म्हणजे बैठी जीवनशैली. जास्त वेळ  एकाच जागी बसल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी धोका वाढतो, लठ्ठपणा वाढतो, मधुमेह, सांधेदुखीचे आजार, पाठदुखीचे आजार , हृदयाचे आजार वाढू लागतात. 

डोळ्यांच्या समस्या- सतत स्क्रीनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. कोरडेपणा आणि जळजळ होते. टीव्ही, मोबाइलमुळे लहान मुलांना अगदी कमी  वयात चष्मा लागतो, डोळ्यांचे आजार वाढतात . या डिजिटल उपकरणांचा निळा प्रकाश डोळ्यांसाठी तर घातक असतोच पण तो तुमच्या झोपण्याच्या सवयींमध्ये सुद्धा चुकीचा बदल घडवतो , त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.

शाररिक ठेवणीमध्ये बदल- डिजिटल उपकरण हातात घेऊन सतत एकाच स्थितीमध्ये दीर्घकाळ बसल्यामुळे पाठीवर मानेवर ताण वाढतो. पाठदुखी,  मानदुखीचा त्रास तर वाढतोच शिवाय तुमच्या शाररिक ठेवणीमध्ये बदल घडतो.

boy 3360415 640

स्क्रीन टाईम चा मानसिक आरोग्यावर परिणाम

कमी होणारी एकाग्रता आणि उत्पादकता-

   सतत कोणत्या ना कोणत्या डिजिटल उपकरणांच्या हाताळल्यामुळे संपर्कामुळे एकाग्रता कमी होते. कोणत्याही कामांमध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते.  याचा जास्त परिणाम तुमच्या व्यावसायिक  आणि कोणत्याही कौटुंबिक कामगिरीवर होतो. त्यामुळे तुमची उत्पादकता कमी होते. कामामध्ये अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.

तणाव आणि मानसिक चिंता

   सोशल मीडिया आणि टीव्ही हे मनोरंजन,बातम्या,आणि इतर माहितीचे भंडार आहे. याद्वारे तुम्ही  तणाव युक्त सामग्रीच्या संपर्कात येता.  सोशल मीडियाच्या आभासी जगामध्ये उगाच स्वतःची तुलना करणे, वेगवेगळ्या न्यूज चॅनेल वरती विचलित करणाऱ्या बातम्या पाहणे, टीव्हीवरील विविध मनोरंजक कार्यक्रमांमध्ये  अनावश्यक भावनिक गुंतवणूक करणे. आभासी जग खरं मानणे. फक्त मनोरंजनासाठी या सर्व गोष्टी तुमचं  भावनिक दृष्ट्या खच्चीकरण करतात.  नको असणारा तणाव वाढवता., आणि तुम्ही मानसिक चिंता आणि तणाव यांचा सामना करू लागता.

smartphone 407108 1280 1

झोपेची समस्या

झोप न येणे हि सगळ्यात धोकादायक मानसिक समस्या आहे . झोपण्याच्या वेळी जर मोबाईल, टॅबलेट या स्क्रीन चा वापर तुम्ही जास्त करत असाल तर नैसर्गिक रित्या झोपण्याच्या चक्रामध्ये तुम्ही स्वतःच अडथळा आणत आहात. वैद्यकीय दृष्ट्या मेलाटोनीन नावाचे हार्मोन झोपेचे नियमन करत असते. कोणतेही स्क्रीनच्या निळा प्रकाश हे हार्मोन चे वेळीच होणारे नैसर्गिक उत्पन्न उत्पादन अनियंत्रित रित्या रोखू शकते. यामुळे  नैसर्गिकपणे  झोप येत नाही. नियमितपणे वेळेत न झोपल्यामुळे आणि वेळेत न  उठल्यामुळे नैसर्गिक रित्या मिळणारे शारीरिक स्वास्थ्य मिळत नाही. यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही समस्या वाढतात. झोपेची गुणवत्ता कमी होते, स्वभाव चिडचिडा होतो, एकाग्रता कमी होते. मानसिक अस्वस्थता वाढते.

मानसिक आणि कौटूंबिक अस्थिरता-

  दिवसभरामध्ये जास्तीत जास्त वेळ हा सोशल मीडिया वर म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, यू ट्यूब वर घालवणे, सतत व्हिडिओ गेम्स खेळत बसणे  हे एक प्रकारे डिजिटल व्यसन आहे. याचा थेट परिणाम तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावरती होतो. एकमेकांमध्ये संवाद हरवतो. कधी कधी पूर्णपणे संपतो.  सुरुवातीला चांगली वाटणारी ही सवय स्वतःमध्येच एकाकीपणा वाढवते. त्यामुळे चिंता वाढते निराशा येते. तणाव वाढतो.

तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम करणारा स्क्रीन टाईम नियंत्रित करण्यासाठी खालील मार्गांचा वापर आवश्य करा.

  1. निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवा. निसर्गात आढळणाऱ्या विविध गोष्टी मुळे जसे हिरवळ, सूर्यप्रकाश, खळखळ, वाहणारे पाणी ,नद्या, समुद्र तुमचा तणाव कमी करून तुमच्या मानसिक आरोग्यावरती सकारात्मक परिणाम घडतो.
  2. विविध प्रकारच्या स्क्रीनच्या वापरासाठी विशिष्ट वेळेचे बंधन पाळा. जर स्क्रीनचा वापर तुमच्या व्यवसायाचा भाग असेल तर नियमित ब्रेक घ्या.
  3. शारीरिक व्यायाम, विविध प्रकारचे मैदानी खेळ, जिम, ट्रेक, पोहणे, चालणे यासारख्या शारीरिक हालचालींवर जास्त वेळ घालवा. नियमित शारीरिक हालचालींमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती सकारात्मक परिणाम होतो वजन नियंत्रित राहते, एकाग्रता वाढते यांची स्नायूंची क्षमता वाढते.
  4. घरातील आणि बाहेरच्या कामाची जबाबदारी स्वतः घ्या.
  5. झोपण्याआधी एक तास स्क्रीन पासून दूर राहिल्यामुळे झोपेचा दर्जा वाढतो. नैसर्गिक रित्या आरोग्याचे संतुलन राहते. शांत झोप लागते.
  6. स्क्रीन टाइम  चे वाढते दुष्परिणाम रोखण्यासाठी डिजिटल डिटॉक्स सारख्या उपायांचा अवलंब जरूर करा.

सारांश : अत्याधिक स्क्रीन वेळेचा प्रभाव ओळखून त्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन त्याने होणारे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी काही उपाययोजना करणे स्वतःच्या आणि कुटूंबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. वास्तविक जीवनाचे, कुटूंबाचे, नात्यांचे महत्व वेळीच जाणून घ्या . वाढत्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःहून स्वतःच्या समस्यांमध्ये वाढ न करता . आरोग्यदायी  आणि आनंदी जीवन जगण्यामध्ये जास्त वेळ सत्कारणी लावा.

FAQ

मोबाईलचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?

मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे मोबाईलचे व्यसन लागते  ज्यामुळे चिंता, नैराश्य आणि झोपेचा त्रास होऊन मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

पालक त्यांच्या मुलांचा स्क्रीन वेळ कसा व्यवस्थापित करू शकतात?

पालक स्क्रीन टाइम  वर  निश्चित मर्यादा आखू शकतात, इतर गोष्टींचा पर्याय उपलब्ध करून देऊ शकतात

3 thoughts on “ स्क्रीन टाईम तुमच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतो ?  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top