नैसर्गिकरित्या पांढरे केस काळे होण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय

नैसर्गिकरित्या पांढरे केस काळे होण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय

नैसर्गिकरित्या पांढरे केस काळे होण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय

सौंदर्याच्या व्याख्येमध्ये केसांचे काळेभोर, लांब, दाट असणे जास्त उत्तम मानले जाते. अशा काळ्याभोर, दाट केसांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य जास्त खुलून दिसते. पण आजकाल पांढऱ्या केसांची समस्या कोणत्याही वयोगटात अगदी सामान्य बनत चालली आहे. ही समस्या फक्त आता वृद्ध व्यक्तींमध्येच राहिलेली नाही, आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जर तुमचे सुद्धा वय कमी असेल आणि केस पांढरे झाले असतील तर तुम्हाला केसांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजच्या या लेखात मध्ये आपण या समस्येपासून कशी सुटका मिळवायची व आपले केस मजबूत आणि दाट कसे बनवायचे हे पाहणार आहोत.

केस पांढरे होण्याची कारणे (Reasons of white hair):-

  1. ताण तणाव
  2. खाण्यापिण्याच्या वाईट सवयी
  3. केसांसाठी अति प्रमाणात हेअर प्रॉडक्ट वापरणे
  4. प्रदूषण
  5. अनुवंशिकता
  6. हार्मोन्स मधील असंतुलन
  7. वृद्धत्व

पांढरे केस काळे करण्यासाठी ११ प्रभावी आयुर्वेदिक उपाय (11 Tips to turn white hair to black)

 आपल्या दैनंदिन जीवनातील वापरात असणारे असे काही पदार्थ आहेत की ज्याचा वापर करून आपण आपले पांढरे झालेले केस परत काळे करू शकतो. फक्त केमिकल युक्त पदार्थांचा वापर करूनच केस काळे होतात असे नाही तर त्यासाठी अनेक नैसर्गिक (Natural) पदार्थ आहेत त्यांनी केस काळे आणि निरोगी होऊ शकतात. हे  उपाय फक्त तुमचे केस काळे करण्यासाठी उपयोगी नसून ते केसांना मुळां पर्यंत पोषण देतात शिवाय केस वाढीसाठी सुद्धा उपयुक्त आहेत.

1) कांदा (Onion) –

कांद्याच्या रसाचा वापर करून तुम्ही पुन्हा तुमच्या केस पूर्वीप्रमाणे काळे करू शकता. कांद्याचा रस काढून तुम्हाला तो केसावर लावायचा आहे व काही वेळानंतर आपले केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे, असे काही दिवस सातत्याने केल्यास तुम्हाला फरक दिसून येईल. यातील   सल्फर मुळे केसांच्या रंगावर परिणाम होतो आणि केसांच्या फॉलिकल्सना पोषण मिळते.

2) कच्ची पपई (Papaya) –

कच्च्या पपईचा वापर करून तुम्ही तुमचे केस पुन्हा एकदा काळे करू शकता. एक कच्ची पपई घेऊन त्याला किसून त्याची पेस्ट तयार करावी, व ती वीस मिनिटापर्यंत केसाला लावून ठेवावी व नंतर धुवून टाकावी.

3) आवळा पेस्ट (Amla) –

आवळा हा केसांसाठी गुणकारी असतो हे सर्वांनाच माहीत आहे. आवळ्याची पेस्ट करून ती केसासाठी वापरल्यास केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आवळ्याची पेस्ट तयार करण्यासाठी चार ते सहा आवळे घ्यावे आणि त्यातील बिया काढून त्याची पेस्ट बनवावी. त्यानंतर ही तयार झालेली पेस्ट काही वेळासाठी आपल्या केसांना लावून ठेवावी, केस सुकल्यानंतर आपले केस धुऊन घ्यावे.

4) कढीपत्ता आणि नारळाचे तेल (Coconut Oil) –

केसांसाठी तुम्ही कढीपत्ता आणि नारळाच्या तेलाचा सुद्धा उपयोग करू शकता. नारळाचे तेल आणि कढीपत्ता मिक्स करून त्याचा वापर आपण केसांसाठी करू शकतो. कढीपत्ता बीटा-कॅरोटीन आणि प्रथिनांचा स्त्रोत देखील आहे, ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि केसांची वाढ वाढते. याच्या वापराने केसांची मजबुती वाढते.

5) बदाम तेल, लिंबाचा रस आणि आवळ्याचा रस (Almond oil, Amla juice, Lemon juice) –

एका वाटीमध्ये चार चमचे बदामाचे तेल, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा आवळा रस टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व त्यांचा केसांसाठी वापर करावा. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात. संशोधनात असे दिसून आले आहे की अँटिऑक्सिडंट्स केसांच्या रोमांना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवू शकतात, यामुळे केस पांढरे होण्याचे  प्रमाण कमी होते. शिवाय बदाम तेल केसांना उत्तम पोषण देते.

6) तीळ आणि गाजराचे तेल (Sesame & Carrot Oil) –

चार मोठे चमचे तिळाचे तेल आणि अर्धा चमचा गाजराच्या बियाचे तेल घेऊन ते चांगल्या पद्धतीने मिक्स करावे जेव्हा ते दोन्ही व्यवस्थित मिक्स होतील तेव्हा त्याचा केसाला लावण्यासाठी वापर करावा. या बिया अत्यावश्यक असंपृक्त स्निग्धाम्ले आणि केसांना आवश्यक खनिजे यांचे  स्रोत मानल्या जातात, जे टाळूचे आरोग्य आणि केसांचा रंग राखण्यासाठी आवश्यक असतात. याच्या वापराने केसांना नक्की फायदा होईल.

7) जास्वन्द (Hibiscus)

फुलांच्या पाकळ्यांची  बारीक करून पेस्ट बनवा. ते तुमच्या केसांना आणि टाळूला लावा. सुमारे एक तास असेच राहू द्या, नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. याची फुले केसांना पोषण देतात   आणि लालसर चकाकी केसांवर आणू शकतात, जे केसांच्या काही रंगांवर गडद दिसतात. या फुलामध्ये अमीनो ऍसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अल्फा-हायड्रॉक्सी ऍसिडसह इतर पोषक घटक देखील असतात, केसांसाठी फायदेशीर असतात.

8) बायोटीन युक्त पदार्थांचा वापर करणे (Biotin rich Products)

बायोटीन हे केसांना अनेक वर्षांपर्यंत काळे ठेवण्याचे काम करते तसेच पांढरे केसांना ते पुन्हा काळे करते. म्हणून बायोटीन युक्त पदार्थांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करावा. ज्या पदार्थांमध्ये बायोटिन आहे असे पदार्थ खावे.

9) विटामिन बी 12 युक्त आहार घ्या (Vit B12 Rich Food) –

ज्या पदार्थांमध्ये विटामिन बी 12 भरपूर प्रमाणात आहे अशा पदार्थांचा वापर जेवणामध्ये करा. जसे की पनीर ,संत्री क्रॅनबेरी, एवोकॅडो या पदार्थांमध्ये विटामिन बी 12 भरपूर प्रमाणात असते. हे पदार्थ केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असतात.

10) काळे तीळ (Black sesame )

यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे आढळून येतात, तसेच तिळामध्ये विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. हे केसांचे गळणे कमी करून त्यांना मजबूत बनवण्याचे काम करतात. तीळ पाण्यामध्ये थोडा वेळ भिजू द्या. त्यानंतर ते मिक्सरमध्ये काढून त्याची पेस्ट करा. तयार झालेली ही पेस्ट आपल्या केसांना व्यवस्थित लावा आणि मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर पाण्याने धुऊन काढा. आठवड्यातून एक दिवस तुम्ही याचा वापर करू शकता.

11) योगासने (Yoga) –

योगासनांच्या मदतीने तुम्ही वयाच्या आधी झालेले पांढरे केस परत काळे करू शकता. तसेच आपले केस मजबूत बनवू शकता. यामध्ये आपल्या दोन्ही हातांच्या नखांना एकमेकांवरती घासायचे आहे, याचबरोबर भ्रामरी प्राणायाम, कपालभाती, आणि भुजंगासनासारखे योगासने करावेत. सातत्याने आणि नियमित या योगासनांचा अभ्यास केल्यास त्याचा केसांना फायदा होतो.

सारांश :-

वरील सर्व उपाय आहेत आपण घरच्या घरी करू शकतो, परंतु जर हे उपाय करत असताना काही त्रास झाल्यास त्वरित हे उपचार बंद करावे व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

FAQ:

केसांसाठी कोणते पदार्थ चांगले आहेत?

केसांसाठी  पोषणयुक्त आहार, बायोटिन युक्त पदार्थ यासोबतच पुरेशी झोप  घेणे गरजेचे आहे.

आपले केस पांढरे का होतात?

आपल्या केसांचा काळा रंग हा मेलानिन ‘नावाच्या  पिगमेंटमुळे असतो. हे पिगमेंट केसांच्या मुळाशी असतात. जेव्हा मेलानिन तयार होणे बंद होते तेव्हा केस पांढरे होऊ लागतात.

One thought on “नैसर्गिकरित्या पांढरे केस काळे होण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top