निसर्गोपचाराची ओळख
निसर्गोपचार ही औषध विरहित चिकित्सा पद्धती असून यामध्ये माती, पाणी,सूर्यप्रकाश, हवा व उपवास या साधनाद्वारे चिकित्सा केली जाते. म्हणून याला पंचमहाभूतांची चिकित्सा असेही म्हटले जाते. आपले शरीर हे एक अलौकिक सजीव यंत्र आहे आणि ज्या पंचमहापतापासून आपल्या शरीर बनले आहे ( पृथ्वी,आप,तेज, वायू,आकाश ) त्याच पंचमहाभूतांचा वापर शरीर दुरुस्तीसाठी करावा असे निसर्गोपचार शास्त्र सांगते.
अनेक रोगांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी शरीर निरोगी ठेवण्यासाठी किंवा एखादा आजार झाल्यास तर त्यातून बरे होण्यासाठी निसर्गोपचार महत्त्वाची भूमिका बजावतो. अशाप्रकारे निसर्गोपचार हा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सुद्धा आहे. आज कालचे बहुतांशी आजार हे मनोकायिक म्हणजे शरीर व मनाशी संबंधित आहेत. तसेच जीवनशैलीशी निगडित आहेत म्हणून अशा आजारांचा सामना करण्यासाठी सर्वांगीण व विधायक उपचार पद्धती असली पाहिजे. जेथे शरीर, मन आणि जीवनशैलीचा विचार केला जातो. अशी उपचार पद्धती म्हणजे निसर्गोपचार व योग होय.
निसर्गोपचार पद्धतीचा सिद्धांत
- पंचमहाभूतांचा सिद्धांत :- शरीरातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी मूळ पंचमहाभूतांचा वापर झाला पाहिजे. यालाच पंचमहाभौतिक सिद्धांत म्हणतात.
- जीवनशक्ती सिद्धांत :- जीवन शक्तीस आपल्या शरीराचे सर्वतोपरीक्षण करते म्हणून निसर्गोपचार सिद्धांतानुसार योग्य संधी दिली असता ही जीवनशक्ती अनेक आजारातून आपल्याला बरेही करते.
- विषाक्त पदार्थ संचय सिद्धांत :- आपल्या शरीरात विविध विषाक्त पदार्थ मलमूत्र घाम व उच्चवासातून बाहेर पडतात, पण काही कारणाने ही घाण उत्सर्जनाद्वारे बाहेर न पडता शरीरात साठली तर मात्र विषाक्त पदार्थाचा शरीरात संचय होऊन ही परिस्थिती अनेक रोगांना कारणीभूत ठरते, म्हणून निसर्गोपचार शास्त्राप्रमाणे सर्व रोगांचे मूळ कारण एकच ते म्हणजे शरीरासाठी घाण ( विषाक्त पदार्थ ). निसर्गोपचार शास्त्रानुसार तीव्र आजार जसे की सर्दी, पडसे, ताप, जुलाब,उलट्या ही सगळी लक्षणे म्हणजे निसर्गाचा शरीरशुद्धीचा खरा प्रयत्न आहे. अशावेळी औषध गोळ्यांनी ही लक्षणे दाबून न टाकता निसर्गोपचाराने बरे करू शकता. निसर्गाचे शरीरशुद्धीचे हे प्रयत्न म्हणजे तीव्र आजार वर्षानुवर्षी औषधोपचारांनी दाबले असता किंवा अशावेळी चुकीचे उपचार झाले असता याचेच रूपांतर जीर्ण आजारात होते. जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवात, दमा, कॅन्सर ,थायरॉईड इत्यादी असे हे जीर्ण आजार उद्भवतात.

निसर्गोपचार शास्त्राचे 10 मूळ सिद्धांत आहेत.
- आजारातून बरे होण्याची शरीराची स्वतःची अशी क्षमता असते.
- रोगांचे कारण मज्जा संस्थेचा थकवा हे आहे.
- विजातीय पदार्थ शरीरात साठणे म्हणजे रोग विकारांची सुरुवात होय.
- तीव्र आजार हे शरीराचे खरे मित्र आहेत.
- शरीरात आधी विजातीय पदार्थांची घाण निर्माण होते मग रोगजंतूंचा प्रवेश होतो.
- दुसऱ्या उपचार पद्धती आराम देतात,पण निसर्गोपचार रोगाचे समूळ उच्चाटन करतो.
- आहार शरीराला ताकद देतो, जीवनशक्ती वाढवीत नाही
- उपवासामुळे सर्व रोग बरे होऊन शरीर रोगमुक्त होते.
- व्यायामाने शरीराचे पोषण आणि उत्सर्जन यात संतुलन राखले जाते.10) निसर्गोपचाराने बरे होण्यासाठी रुग्णाचा विश्वास, इच्छा व निश्चय असला पाहिजे.
- निसर्गोपचाराने बरे होण्यासाठी रुग्णाचा विश्वास, इच्छा व निश्चय असला पाहिजे.
निसर्गोपचाराचे उपचार (प्रकार)
- मातीची चिकित्सा ( पृथ्वीतत्त्व )
- उपवास चिकित्सा (आकाश तत्व )
- सूर्यप्रकाश (अग्नी तत्व )
- हवा (वायूतत्व )
- पाण्याचे उपचार (जलतत्व )
- मालिश चिकित्सा
- आहार चिकित्सा