मानसिक आरोग्याबद्दलच्या संभाषणांमध्ये वारंवार येणारा शब्द म्हणजेच चिंता किंवा नैराश्य. ही एक सामान्य मानसिक आरोग्याची स्थिती असून यामुळे जगभरातील लाखो लोक त्रस्त आहेत आणि योग्य मदतीच्या आशेने रोज ह्या स्थितीचा संघर्ष करत आहेत. ही प्रत्येकासाठी वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते ज्यामध्ये सौम्य अस्वस्थतेपासून ते गंभीर पॅनीक अटॅक पर्यंतचे वेदनादायी परिणाम होताना दिसून येतात. हा विकार समजून घेणे आणि त्यावर वेळीच उपचार करणे महत्त्वपूर्ण ठरते. ह्या ब्लॉगमध्ये आपण चिंता, त्याची लक्षणे, कारणे आणि उपचार यांबद्दल सखोल माहिती घेणार आहोत.
चिंता म्हणजे काय?
तणाव वाढल्यावर आणि सतत बदलत्या जीवनशैलीमुळे जे नैराश्य, अस्वस्थता किंवा भीतीची भावना जाणवते त्यालाच चिंता म्हणतात. ज्यामध्ये अनेकदा घाम येणे, अस्वस्थता आणि हृदयाचे ठोके जलद होणे यासारखी शारीरिक लक्षणे दिसून येतात. अधूनमधून ही स्थिति उद्भवणे हे सामान्य असू शकतो परंतु सातत्याने जर चिंता जाणवत असेल तर त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
चिंतेची कारणे कोणती?
चिंतेचे नेमके कारण पूर्णपणे समजलेले नाहीत पण जी वैद्यकीयरित्या स्पष्ट झालेली जी कारणे आहेत ते प्रत्येकसाठी वेगळी असू शकतात परंतु अनुवांशिक, पर्यावरणीय, मनोवैज्ञानिक आणि इतर घटकांच्या बदलांमुळे हा त्रास उद्भवू शकतो असे मानले जाते.
व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये: विशिष्ट व्यक्तिमत्त्व गुणधर्म असलेल्या व्यक्ती उदा. ज्यांना काळजी करण्याची सवय असते, ज्या व्यक्ती मनाने हळव्या असतात किंवा ज्या खूप लवकर भावनिक होतात ते चिंताग्रस्त होऊ शकतात.
अनुवंशिकता: नैराश्य हे विकार कुटुंबांमध्ये अनुवांशिक पूर्वस्थिती नुसार पुढील पिढीकडे जाऊ शकतात ज्याचे परिणाम कमी, जास्त, गंभीर, सौम्य अथवा वेगळे असू शकतात.
जीवनातील चढउतारांचे प्रभाव: दीर्घकाळापर्यंत ताण, घडलेल्या किंवा घडत असलेल्या अनेक अत्यंत क्लेशकारक घटना, आणि जीवनातील महत्त्वपूर्ण बदल चिंता निर्माण करू शकतात.
मेंदूतील रासायनिक बदल: सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या न्यूरोट्रांसमीटरमधील (चेतातंतूच्या टोकाला तयार होणारी रसायनांमधील) असंतुलन काही घटकांवर परिणाम करून चिंता वाढवू शकतात.
अपूर्ण झोप: शांत आणि पुरेशी झोप न झाल्यास बऱ्याच वेळा शरीर आणि मन अस्वस्थ होते ज्यामुळे हा विकार वाढण्याची शक्यता असते.
आहार आणि जीवनशैली: पौष्टिक आहार न घेणे, पुरेसे व वेळेत न जेवणे, जास्त प्रमाणात मद्यपान, आणि तंबाखूचे सेवन करणे हो चिंता वाढण्याची करणे असे शकतात. तसेच, असंतुलित जीवनशैली देखील ह्या त्रासासाठी कारणीभूत ठरू शकतो.
जीवनातील मोठे बदल: नवीन जबाबदारी येणे किंवा काही बदल जसे की नवीन नोकरी, विवाह होणे, मुलांचा जन्म, नवीन ठिकाणी राहायला जाणे यांमुळे अस्वस्थता वाढून नैराश्य वाढते.
वैद्यकीय परिस्थिती: जुनाट आजार जसे की हृदयविकार, मधुमेह, सोरायसीस, कुष्ठ रोग, जन्मतः दिव्यांग असणं व इतर अनुवंशिक आजार नैराश्य वाढवू शकतात.
चिंतेची लक्षणे कोणती?
शारीरिक लक्षणे
चिंताग्रस्त व्यक्तींमध्ये अनेक शारीरिक लक्षणे दिसून येतात जसे की धाप लागणे, थकवा जाणवणे, निद्रानाश होणे, झोपण्याच्या किंवा खाण्याच्या पद्धतींमध्ये बदल, जास्त घाम येणे, मळमळ आणि अतिसार यांसारख्या जठर व आतड्यांच्या (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल) समस्या, स्नायूंचा ताण वाढणे, वारंवार डोकेदुखी होणे, हात, पाय आणि तोंड कोरडे पडणे, हृदयाची धडधड वाढणे, संवेदना वाढणे, अंग थंड पडणे, सुन्नपणा किंवा मुंग्या येणे यांचा समावेश होतो.
मानसिक लक्षणे
हि स्थिती अनेक मानसिक परिणाम वाढवून शारीरिक स्थितीवर देखील प्रभाव करते. त्रास जाणवणाऱ्या व्यक्तींना लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येऊ शकतात, तर्कहीन भीती वाटू लागते, नेगेटिव विचारांचे प्रमाण वाढून भीती वाढते, तसेच वेडसर विचार वाढू शकतात. याव्यतिरिक्त, अनेकदा दैनंदिन कार्ये हाताळण्याची किंवा निर्णय घेण्याची त्यांची क्षमता कमी करू शकते.
वर्तणूकीतील लक्षणे
वर्तणुकीनुसार, चिंता, अस्वस्थता वाढू लागणे, स्वतःला शांत करण्यास असमर्थता वाटणे, सामाजिक गोष्टींपासून दूर राहणे हे घडू शकते. अश्या व्यक्तींमध्ये गर्दीच्या ठिकाणी जाताना वाटणारी भीती, चिडचिड होणे, छोट्या छोट्या गोष्टीत विसराळूपणा वाढणे आणि सामान्य दैनंदिन काम करण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये स्वत:चा औषधोपचार करण्यासाठी ड्रग्स किंवा अल्कोहोल सारख्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहणे हे सुद्धा दिसून येते.
चिंतेसाठी उपचार कोणते आहेत?
औषधे
ह्या आरोग्य समस्यांमधून मुक्त होण्यासाठी औषधे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. विशेषत: काही सामान्य नैराश्यासंबंधी विकारांवर औषधोपचार उत्तम उपाय असू शकतो जो सहज उपलब्ध देखील आहे. तसेच डॉक्टर किंवा तज्ञांसोबत होणारे त्रास, त्यातून जाणवणारे दुष्परिणाम ह्यावर चर्चा करणे महत्त्वाचे ठरते तसेच वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्यावर प्राथमिक उपचार कसा करता येईल हे जाणून घेणे फायद्याचे ठरते.
मानसोपचार
मनोचिकित्सा हे चिंतेवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय असून ज्यात विविध उपचारांचा समावेश असतो. या थेरपींचे उद्दिष्ट नकारात्मक विचारांच्या पद्धती सुधारणे आणि संज्ञानात्मक पुनर्रचना (Cognitive Restructuring) यांसारख्या तंत्रांद्वारे भीती कमी करणे आहे. हे उपचार व्यक्तीच्या विशिष्ट लक्षणांनुसार ठराविक काळ घ्यावे लागतात आणि बऱ्याचदा मर्यादित सत्रांमध्येच लक्षणीय सुधारणा होतात.
स्वतःसाठी सतर्क राहणे
सौम्य ते मध्यम चिंतेतून बरं होण्यासाठी स्वतःच जागरूकता वाढवून स्वतःची मदत करणे उपयोगी ठरते. श्वासोच्छवासाचे व्यायाम, ध्यान करणे यासारखे उपाय फायदेशीर ठरतात. ह्यामुळे त्रस्त व्यक्ती विचार शांत करून आणि जागरूकता वाढवून ह्या समस्येवर मात करू शकते. याव्यतिरिक्त, नियमित व्यायामात स्वतःला व्यस्त ठेवणे आणि स्नायूंमध्ये शिथिलता आणणे यासारख्या तंत्रांचा सराव केल्याने नैराश्य कमी होऊ शकते.
सारांश
सध्या चिंता ही सामान्य आरोग्य स्थिती आहे मात्र तिचा उपचार करणे आणि त्यातून पूर्ण बरे होणे शक्य आहे. परंतु वेळेत उपचार न केल्यास व्यक्तीच्या जीवनावर आणि व्यक्तिमत्वावर गंभीर परिणाम होऊ शकतो. चिंतेचे स्वरूप समजून घेऊन, लक्षणे ओळखून त्यावर त्वरित उपचार करून आपण मानसिक आरोग्य आणि एकंदरीत जीवनमान सुधारण्यासाठी सक्रिय पावले उचलू शकतो. इलाज करण्यासाठी तज्ञांची मदत घेणे अत्यावश्यक ठरते.
प्रश्नोत्तरे
आपण औषधांशिवाय नैराश्य दूर करू शकतो का?
औषधांशिवाय नैराश्य घालवायचे असेल तर नियमित व्यायाम, निरोगी आहार, दीर्घ श्वासोच्छ्वास आणि ध्यान यासारख्या आराम देणाऱ्या उपायांचा दैनंदिन जीवनशैलीत समावेश करणे गरजेचे आहे.
नैराश्य आणि डिप्रेशन यांच्यात काय फरक आहे?
नैराश्य, तणाव किंवा चिंतेचा तात्पुरता प्रतिसाद असतो म्हणजेच तो काही काळाने बरा देखील होतो पण डिप्रेशनमध्ये तीव्र भीती आणि काळजी असते जी दैनंदिन जीवनात व्यत्यय आणते आणि दीर्घकाळ टिकते.