8 Healthy Lifestyle Habits
आरोग्य संपन्न आणि निरोगी जीवनशैली असणं आनंदी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आरोग्यदायी जीवनशैली समाधानी, स्थिर आणि आणि यशस्वी जीवन प्रदान करते. आजकाल, बदलती जीवनशैली, वाढत चाललेल्या अपेक्षा आणि खर्च यांमुळे निरोगी जीवन जगणे अवघड बनत चालले आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही निरोगी आहात, खऱ्या अर्थाने, चांगले आरोग्य म्हणजे मानसिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी असणे आहे . जरी अनेक घटक तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करत असले तरी, अधिक योग्य आणि चांगले जीवन जगण्यासाठी आपण आपली जीवनशैली आणि सवयी जाणूनबुजून बदलू शकतो. तुमच्या जीवनशैलीतील छोटे बदल तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकतात. हे बदल अनेक बाबतीत करता येतात.
तुमचा आहार ,व्यायाम, आनंदी असण्याची आणि आनंदी राहण्याची तुमची व्याख्या, क्रियाशील राहणे, तुमच्या दैनंदिन जीवनातील सवयी अशा अनेक गोष्टींचा यात समावेश होतो.
निरोगी जीवनशैली म्हणजे काय?
निरोगी म्हणजे शरीरात योग्य प्रतिकार शक्ती असणे आणि तुमच्यामध्ये कोणताही थकवा न येता काही मैल चालण्याची क्षमता समाविष्ट असणे हे आहे. याशिवाय शारीरिक दृष्ट्या निरोगी असण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला ताजेतवाने आणि वेदना रहित वाटले पाहिजे. यातून तुमच्यातील शाररिक क्षमतांचा ,आरोग्याचा अंदाज तुमचा तुम्हालाच घेता येऊ शकतो
आरोग्य निरोगी कशामुळे बनते?
- नियमित व्यायाम
- संतुलित पोषक आहार
- पुरेशी विश्रांती
- तणाव व्यवस्थापन
- वाईट सवयी
- आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
- मानसिक आरोग्य
- संघटित राहणे
आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि अध्यात्मिक कल्याणाची स्थिती आहे.
नियमित व्यायाम (Regular Exercise) :-
सामान्य माणसाने आठवड्यातील निदान पाच दिवस दररोज 30 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे . तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास किंवा विशिष्ट फिटनेस साठी अधिक व्यायाम करावा.
लोकांनी असा व्यायाम करावा ज्यात त्यांना खरोखर आनंद मिळतो. यात योगासने,एरोबिक, झुंबा , चालणे, धावणे, खेळ,नृत्य सायकल चालवणे इत्यादी व्यायाम प्रकार येतात.
व्यायाम करताना जलद गतीने श्वासोच्छवास होत असल्याने जास्त प्रमाणात ऑक्सिजन शरीरात घेतला जातो तसेच रक्तप्रवाह सुधारतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचन सुधारून शरीराची ताकद वाढते.
त्यामुळे रोग टाळता येऊ शकतो. शारीरिक हालचाली दरम्यान आणि नंतर शरीरात चांगली रसायने किंवा चांगली संप्रेरके सोडली जातात.
संतुलित पोषक आहार- A balanced nutritional diet :-
अन्न हे मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे झीज भरून काढणे ऊर्जा निर्मिती कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडवून येतात. शरीर पोषण व संवर्धन यासाठी कर्बोदके, प्रथिने, पाणी, फायबर, जीवनसत्व व खनिज द्रव्य यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्यांचे योग्य प्रमाणात आपल्या आहारात पाहिजे. सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असा आहार ठेवणे गरजेचे आहे. आहारात पालेभाज्या भाज्या,फळे, ज्वारी,बाजरी, गहू,तांदूळ ,नाचणी, डाळी,शेंगदाणे तेल ,तूप या गोष्टींचा समावेश करावा.
पुरेशी विश्रांती Enough Sleep :-
दररोज रात्री पुरेशी झोप घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती, स्मरणशक्ती, एकाग्रता, आकलन शक्ती आणि मूड सुधारू शकतो. लोकांनी सात ते आठ तास झोपेचे लक्ष्य ठेवले पाहिजे. यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या दीर्घकालीन स्थितीचा धोका कमी होतो.
तणाव व्यवस्थापन Stress Management :-
तणाव ही मानसिक अवस्थेची व्याधी आहे कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे तणाव होय.
तणावाच्या लक्षणांमध्ये गोष्टी विसरणे ,लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, थकवा किंवा खूप कमी झोप अनुभवणे चिडचिड होणे ही लक्षणे दिसतात.
तणाव योग,ध्यान विश्रांती,व्यायाम, खेळ, संवाद,जीवनशैली बदल, पुरेशी विश्रांती याचा अवलंब केल्यामुळे कमी होतो.
वाईट सवयी Bad Habits :-
1) फास्टफूड चे सेवन, जास्त प्रमाणात मद्यपान करण्याची सवय असल्याने काही गंभीर आरोग्यविषयक समस्या उद्भभवू शकतात. उच्च रक्तदाब, हृदयविकार,पक्षाघात आणि विशिष्ट कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
2) धूम्रपणाच्या वाईट सवयीमुळे फुफ्फुसांचे आजार आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यासारख्या काही आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याचा धोका असतो.
आरोग्य तज्ञ सल्ला Health Expert Advice :-
तुमचे आरोग्य सुधारण्याचा आणि राखण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे डॉक्टरांना नियमित भेट देणे. तुमचे फॅमिली डॉक्टर तुम्हाला तुमचे आरोग्य कसे सुधारता येईल याविषयी योग्य सल्ला देऊ शकतील.
मानसिक आरोग्य Mental Health :-
स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःला आणि तुमच्या जीवनाला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे होय. जेव्हा तुम्ही स्वतःला दयाळूपणा आणि करुणा दाखवता तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात आनंदी, आत्मविश्वास आणि समाधानी वाटण्याची शक्यता जास्त असते. जे तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी चांगले कार्य करू शकतात.
समाजातआणिकुटुंबातसंघटितराहणे To be Organized in Society and Family :-
जीवनामध्ये तुमच्या स्वभावानुसार तुम्ही केलेली लोकांची निवड , लोकांशी , कुटुंबियांशी स्थिर निरोगी संबंध , मिळून मिसळून जीवनाचा आनंद घेण्याची तुमच्यातली क्षमता, प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा साकारात्मक दृष्टिकोन अशा अनेक गोष्टी मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यास काही प्रमाणात मदत करतात.
तुमचे मित्र कुटुंब, महत्वाचे इतर हितसंबंधी लोक आणि तुमच्या समुदायातील लोकांमध्ये दर्जेदार वेळ घालवा.
सारांश :- योग्य आहार , दीर्घ कालीन सातत्यपूर्ण व्यायाम , सकारात्मक दृष्टिकोन, संस्कृती , जीवनशैली आणि विचारांची घातलेली योग्य सांगड यातून निश्चित पणे मानसिक आणि शाररिक आरोग्य निरोगी राखण्यास मदत होईल. स्वतःसोबतच इतर लोकांचाही विकास साधण्यास मदत होईल.
प्रश्नोत्तरे:-
सर्वोत्तम निरोगी दिनचर्या कोणती आहे?
सात्विक आहार , नियमित व्यायाम , चांगल्या सवयी , पुरेशी झोप , चांगले मानसिक आरोग्य राखणे, यांचा समावेश निरोगी दिनचर्येत होतो.
निरोगी जीवनशैलीचा सगळ्यात मोठा फायदा कोणता आहे?
दीर्घकालीन आजारांना तुम्ही रोखू शकता आणि निरोगी राहून जीवनाचा खरा आनंद घेऊ शकता.
Nice content 👍