अल्झायमर म्हणजे काय ? कारणे , लक्षणे आणि उपचार

memory 4894438 640 1

अल्झायमर म्हणजे काय ? कारणे , लक्षणे आणि उपचार

अल्झायमर हा एक जटिल  असा मेंदूचा विकार असून  रुग्ण आणि त्यांचे  जवळचे नातेवाईक यांच्यासाठी अतिशय त्रासदायक आजार आहे. हा आजार जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत आहे , यामुळे प्रामुख्याने व्यक्तीची स्मृती ,आकलन शक्ती आणि दैनंदिन कार्य बिघडते. या आजाराचे टप्पे जसे जसे वाढत जातात तसे तसे याची जटिलता वाढत जाते.

 अल्झायमर होण्याची कारणे :-

हा आजार मेंदूमध्ये बीटा- अमायलोईड प्लेक्स आणि टाऊ टँगल्स या दोन प्रथिनांच्या असामान्य संचयन झाल्याने होतो. ही प्रथिने तयार होण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

   परंतु तसे अल्झायमर होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात.

1) अनुवंशिक घटक :- कुटुंबात पूर्वी कोणाला अल्झायमर झालेला असल्यास हा आजार होण्याचा धोका संभवतो.

APOE जनुक सारख्या विशिष्ट जनुकांमधील उत्परिवर्तन(पेशींच्या जनुकीय माहितीत घडून आलेला बदल) अल्झायमरच्या उच्च जोखमी शी संबंधित आहे.

2)  साठ वर्षाच्या वयानंतर ही स्थिती विकसित होऊन अंदाजे दर पाच वर्षांनी धोका दुप्पट होत असतो.

3) जीवनशैली घटक :- चुकीचा आहार, शारीरिक हालचालीचा अभाव, धूम्रपान, आणि जास्त मद्यपान यासारख्या जीवनशैलीमुळे अल्झायमरचा धोका वाढू शकतो.

ai generated 8407103 1280

अल्झायमरची लक्षणे कोणती आहेत?

1) संभ्रम :- अल्झायमर असलेल्या व्यक्ती विचलित होऊ शकतात ,वेळेचा मागोवा गमावू शकतात आणि परिचित ठिकाणे  किंवा लोकांना ओळखण्यात समस्या निर्माण होते.

2) खराब निर्णय:- अल्झायमर मुळे निर्णय घेण्याची क्षमता कुमकुवत होते ,निर्णयाचा अभाव होऊ शकतो.

3) व्यक्तिमत्त्वातील बदल :- अल्झायमरच्या रुग्णांमध्ये मूड स्विंग , चिडचिडेपणा आणि व्यक्तिमत्त्वातील बदल सामान्य आहेत.

4) दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होणे :- या आजाराचे टप्पे जसे जसे वाढत जातात ,तसतसे व्यक्तींना अंगावर कपडे घालणे,आंघोळ करणे आणि स्वयंपाक करणे यासारखे नित्य कार्य करण्यासाठी त्रास होतो.

5) दीर्घकालीन स्थिती :- अल्झायमर रोगाची लक्षणे सहसा स्मरणशक्ती कमी होण्यापासून सुरू होतात . यात पुढे स्मरणशक्ती कमी होणे, अलीकडील घटना आणि संभाषणे लक्षात ठेवण्यात अडचण निर्माण होणे हे एक लक्षण आहे.

6) भाषेच्या समस्या :- योग्य शब्द शोधण्यात संभाषणाचे अनुसरण करणे किंवा त्यात सामील होणे आणि सुसंगतपणे लिहिण्यात अडचणी येऊ शकतात.

 अल्झायमरच्या आजारासाठी उपचार :-

1) जीवनशैलीतील बदल :- नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सामाजिक व्यस्थतेसह निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्याने मेंदूचे आरोग्य राखण्यात आणि अल्झायमर आजाराची प्रगती कमी होण्यास मदत होऊ शकते.

2) संज्ञानात्मक प्रशिक्षण कार्यक्रम,व्यावसायिक थेरपी संज्ञानात्मक कौशल्य सुधारू शकतात

3) अल्झायमरच्या रुग्णांना अनेकदा आधाराची आवश्यकता असते .काळजी घेणारे सहाय्यक गट आणि अल्झायमरच्या काळजी मध्ये विशेषज्ञ असलेल्या संस्थाकडून मदत मिळू शकते.

4) काही क्लिनिकल चाचण्यांमध्ये भाग घेतल्याने तसेच वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकांना दर सहा महिन्यांनी ब्लड टेस्ट  करायला हवी. रुटीन चेकअप करायला हवं. यात लिव्हर प्रोफाइल,किडनी प्रोफाइल, विटामिन बी -12, विटामिन डी याची टेस्ट करायला हवी मात्र काही गोष्टी अशा आहेत की ज्या जाणवल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, यामुळे रुग्णावर अत्याधुनिक उपचार होऊ शकतात.

5)अल्झाइमर न होण्यासाठी हा जिभेचा व्यायाम प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत.

जसे…

1) शरीराचे वजन संतुलित ठेवणे

2) रक्तदाब संतुलित ठेवणे

3) मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे

4) दमा कमी करणे

5) जवळची दृष्टी चांगली करणे

6) कान गुंजने कमी करणे

7) घसा कमी खराब होणे 

8) खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे

9) झोप चांगली लागणे.

व्यायाम अगदी सोपा आणि शिकण्यास सुलभ आहे. दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करा.

 आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे उजवीकडे हलवा. जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास काही प्रमाणात मदत होते. वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा मोठ्या मेंदूशी संबंध आहे.  जेव्हा आपण म्हातारे आणि अशक्त होतो, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बर्‍याचदा आपण जीभ चावतो. जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल, आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत होईल.

 रुग्णाची मानसिक उत्तेजना वाढवण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे – जसे कि मेंदूला आव्हान देणाऱ्या क्रिया रोज करणे , वाचन करायला लावणे, कोडी सोडवणे. याने  मेंदू जास्तीजास्त सक्रिय होण्यास मदत मिळते.

रुग्णाला पुरेशा प्रमाणात गुणवत्तापूर्ण झोप मिळण्यासाठी झोपेच्या चांगल्या सवयींना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

अल्झायमर या आजारावर योग्य उपचार उपलब्ध नसला तरी, रुग्णाच्या आरोग्याची संपूर्णपणे काळजी घेणे , त्यांची जीवनशैली पूर्णपणे निरोगी आणि सक्रिय ठेवणे  आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top