उष्माघात आणि डिहायड्रेशन रोखणारे सर्वोत्तम पेय 

जीवनसत्त्वे व इलेक्ट्रोलाइट्सने भरपूर- नारळपाणी

नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट-समृद्ध नारळपाणी तुम्हाला ताजेतवाने, हायड्रेटेड ठेवून शरीराला तीव्र उष्णतेचा सामना करण्यास मदत करते.

रोगप्रतिकारक विटामीन सी ने भरपूर- लिंबूपाणी

उन्हाळ्यातील सर्वोत्कृष्ट पेय म्हणजेच लिंबू पाणी तुम्हाला ताजेतवाने आणि हायड्रेटेड ठेवते.

बहुगुणी व झटपट थंडावा देणारे- कोकम सरबत

कोकम सरबत तुमच्या शरीराला झटपट थंड करतेच त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि पचन सुधारते.

मौसमी पेय- कैरीचे पन्हे

कैरीचे पन्हे लोह, व्हिटॅमिन सी, आणि फॉलिक ऍसिडचा उत्तम स्रोत आहे जे तहान भागवते, शरीर थंड करते.

जीवनसत्त्वे आणि खनिजे युक्त ताक उष्णतेमध्ये नैसर्गिकरित्या तुमचे शरीर थंड करून ऊर्जा पुनर्संचयित करते.

थंडगार व उत्कृष्ट हायड्रेशनचा स्त्रोत- ताक

उन्हाळ्यातील उत्तम पेय- उसाचा रस

उसाचा रस हा मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोहाचा चांगला स्रोत आहे, जो तुम्हाला हायड्रेट ठेवतो.