योगाचे ६ आश्चर्यकारक फायदे

नियमित योगा केल्याने शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनते तसेच ताकद वाढून स्नायूंचे दुखणे कमी होते.

योगा ताण तणाव दूर करून शरीराला व मनाला दिवसभर उर्जावान तसेच आनंदी ठेवण्यास मदत करते.नैराश्य नाहीसे होते.

योगाभ्यासामुळे  नकारात्मक भावना कमी होऊन  मनाची एकाग्रता आणि आकलन शक्ती वाढते.

नियमित योगासने केल्याने पचनक्रिया सुधारून वजन संतुलित राहते, दीर्घकालीन आजार होत नाहीत.

योगाभ्यास मज्जासंस्थेला शांत करण्यास फायदेशीर ठरतो. झोपेच्या समस्या दूर होतात शिवाय स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

श्वसनाच्या वेगवेगळ्या क्रियांनमुळे श्वसन, पचन आणि स्नायूंचे आजार दूर होतात त्यामुळे  शरीर सुदृढ बनून प्रतिकारशक्ती वाढते.