दररोज चालण्याचे ५ जबरदस्त फायदे

नियमित चालण्यामुळे हृदयरोग , मधुमेह , पचनाचे विकार, श्वासाचे त्रास कमी होतात, फुफ्फुसांची क्षमता सुधारते  आणि आयुर्मान वाढतं

कोणत्याही साधनाशिवाय केला जाणाऱ्या या व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते, शिवाय चयापचय क्रिया सुधारते व  वजन नियंत्रित राहते

रोज चालण्याने वजन कमी होतेच शिवाय तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता, तुमचा मूड चांगला राहतो, मानसिक आरोग्य सुधारते.

काही तासांच्या चालण्याच्या व्यायामामुळे संधिवात, स्नायूंचे दुखणे, पाठीचे दुखणे  अशा बऱ्याच शाररिक व्याधी कमी होतात.

चालण्यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते, कार्यक्षमता वाढते, वजन नियंत्रित राहते यासोबतच तुमची निरोगी जीवनाकडे वाटचाल सुरू होते.