कसं जपाल स्वतःच मानसिक आरोग्य ?

Mental health

कसं जपाल स्वतःच मानसिक आरोग्य ?

सध्या मानसिक आरोग्य हा अगदी सहज कानावर येणार किंवा वाचनात येणारा विषय आहे. आणि तो का नसावा? कारण आत्ताच्या काळात तो तितकाच गंभीर आणि चर्चात्मक मुद्दा झाला आहे. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याइतकेच महत्वाचे ठरते आहे. आपल मन आनंदी आणि उत्साही असल की सगळ कस प्रसन्न वाटत, शरीर उत्साही वाटत आणि दैनंदिन जीवन मजेशीर वाटत. नाही का? 

आजच्या वेगवान जगात वेगाने पळण्यासाठी आपण सगळे घाई-गडबडीत आणि व्यस्त दिनचर्येत अडकतो पण स्वतःचे आरोग्य जोपासायला विसारतो. आणि आरोग्य म्हणजे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य सुद्धा जपण आणि त्याला प्राधान्य देणे तितकच महत्वाच आहे. पण कस जपाल स्वतःच मानसिक आरोग्य?

तुमचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी व व्यवस्थापित करण्यासाठी येथे काही सोपी परंतु प्रभावी उपाय आहेत जे तुम्ही सहज करू शकता.

स्वतःची काळजी घेणे

स्वतःची काळजी घेणे म्हणजे काय तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत पौष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, आणि आराम करण्यासाठी वेळ देणे. तसेच स्वतःसाठी आवडते असे काही उपक्रम नियोजित करणे ह्याचा देखील समावेश होऊ शकतो. ह्या सगळ्यामुळे तणाव कमी होण्यास आणि आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

छंद जोपासणे 

आपले छंद जोपासणे, त्यात वेळ घालवणे कोणाला नाही आवडणार? म्हणून तुमची दिनचर्या अशी शेड्यूल करा ज्यात तुमचे छंद जोपासले जातील. वेळ काढून वाचन करणे, संगीत ऐकणे, फिरायला जाणे, निसर्गात वेळ घालवणे आणि कमी ताण-तणावाच्या छंदांमध्ये गुंतणे म्हणजेच आरोग्य जोपासणे. 

pottery 8026824 1280 1

व्यायाम करणे

ध्यानधारणा, योगा, दीर्घ श्वासोच्छवासाचे किंवा इतर शारीरिक  व्यायाम यासारख्या सजगतेचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश असणे फार महत्वाचे ठरू शकते. यामुळे तुम्हाला तुमच्या विचार आणि भावनांबद्दल अधिक जागरूक होण्यास आणि ताण तणाव तसेच चिंता अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत होऊ शकते. व्यायाम केल्यानी तुम्ही मानसिकच नाही तर तुमचे शारीरिक आरोग्य देखील स्वस्थ ठेवू शकता.

मैत्री व नाती जोपासणे

चांगल्या मानसिक आरोग्यासाठी सामाजिक आणि वैयक्तिक संबंध जोपासणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तींच्या, मित्र, आणि कुटुंबातील सदस्यांशी संपर्कात राहणे सुद्धा फायद्याचे ठरू शकते. कुठल्याही पद्धतीने जसे की भेटून, फोन कॉल करून किंवा सोशल मीडियाद्वारे संपर्कात राहण्याचा प्रयत्न करा. कारण त्यामुळे सुद्धा तुम्हाला भावनिक आधार मिळू शकतो आणि तुमचा वेळही चांगला जाऊ शकतो.

तज्ञांचा सल्ला घेणे

जर तुम्ही आरोग्यदायी दिनचर्या पाळून देखील तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य स्वतःच व्यवस्थापित करण्यासाठी संघर्ष करत असाल, तर मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ यांचा सल्ला किंवा मदत घेऊ शकता. ठराविक काळात जर तुम्ही स्वतः स्वतःचे मानसिक आरोग्य नाही जपू शकलात तर मानसिक आरोग्य तज्ञ, जसे की थेरपिस्ट किंवा समुपदेशक तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत, मार्गदर्शन करू शकतात तसेच तुम्हाला संसाधने (Resources) देऊ शकतात.

आपल्या दिनचर्येत हे काही साधेसे बदल किंवा सुधारणा करणे काही फार अवघड आहे का? आणि जर हे बदल आपल्याला आपली स्वतःची काळजी घेण्यास व आरोग्य जोपासण्यास खूप मोठी मदत करू शकत असतील तर ते निश्चितच केले पाहिजेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मानसिक आरोग्य जपण्यासाठी व सुधारण्यासाठी तुम्ही योग्य त्या वेळी तो त्रास किंवा लक्षणे ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत.  

आता, महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला कसे कळेल की तुमचे मानसिक आरोग्य जपण्याची किंवा व्यवस्थापित करण्याची खूप गरज आहे? तर प्रत्येकासाठी लक्षणे व परिस्थिति वेगळी असू शकतात म्हणून डॉक्टर किंवा तज्ञांना भेटून ते सुनिश्चित करणे महत्वाचे ठरेल. 

सारांश

आपले मानसिक आरोग्य जपणे ही एक नियमित प्रक्रिया आहे ज्यासाठी त्याकडे बारकाईने लक्ष देणे व काळजी घेणे आवश्यक आहे. स्वत: ची काळजी घेण्यास प्राधान्य देऊन, छंद जोपासून, निरोगी राहून, विश्रांती घेऊन, व्यायाम करून, जोडलेले राहून, आणि आवश्यकतेनुसार तज्ञांची मदत मिळवून, तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य जपू शकता आणि अधिक निरोगी व आनंदी जीवनाची मजा घेऊ शकता.

प्रश्न :

मानसिक आरोग्य आपल्या दिनचर्येमूळे बिघडू शकते का?

नक्कीच! जर तुमची  दिनचर्या योग्य  नसेल , तर शाररिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा   चुकीचा प्रभाव पडतो.

शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे एकमेकांवर अवलंबून आहेत का?

तुमचं शरीर आणि मन एकमेकांपासून वेगळे नाहीत. दीर्घकालीन मानसिक आरोग्याच्या समस्या शाररिक आरोग्यावर परिणाम करतात. जसे की डोकेदुखी, निद्रानाश, एकाग्रता कमी होणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top